परिचय
आमच्याबद्दल माहिती

ग्रामपंचायत
काजळी रोहीणा हे पंचायत समिती सेलु जि.परभणी येथील ग्रामपंचायत असून २०११ च्या जनगणने नुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्या ७९३ असुन त्यापैकी पुरुष ४०६ आणि महिला ३८७ आहेत . गावात देवीची यात्रा असते तसेच गावाला लगत दुधना नदी असुन गावाला यासोबतच तालुका स्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार सन २०२१-२२ प्राप्त आहे व जिल्हा स्तरीय संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत पुरस्कार २०२२-२३ प्राप्त आहे.
ग्रामपंचायत काजळी रोहिणा दूरदृष्टी ही गावाचा शाश्वत विकास करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे, जे भास्कर पेरे पाटील यांच्यासारख्या माजी सरपंचांच्या नेतृत्वात राबवण्यात आले. यामध्ये सौर ऊर्जा वापरणे, कचरा व्यवस्थापन करणे, महिला सक्षमीकरण करणे आणि स्वच्छ व पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

दूरदृष्टी

ध्येय
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.
उद्देश आणि कार्ये
मुख्य उद्दिष्टे:
मुख्य कार्ये:
लोकसंख्येबद्दल
मूलभूत लोकसंख्येच्या तपशीलांचा सविस्तर सारांश:-
गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ७९३ आहे, ज्यामध्ये अंदाजे ४०६ पुरुष आणि ३८७ महिला आहेत, लिंग गुणोत्तर प्रति १००० पुरुषांमागे ९५३ महिला आहे.
गावात ०-६ वर्षे वयोगटातील सुमारे ११५ मुले आहेत, जी गावातील तरुण लोकसंख्येचे प्रतिबिंब आहे.
गावात अनुसूचित जाती (SC) चे ७४ लोक आहेत.
गावाचा साक्षरता दर सुमारे ६०.५३% आहे, पुरुष साक्षरता ६९.९५% आणि महिला साक्षरता ५०.६५% आहे.
गावात सुमारे १५१ कुटुंबे आहेत.
